
नवी दिल्ली : इंग्लंडमधील कसोटी मालिका २-२ अशा बरोबरीत राखण्यात यश मिळवणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार शुभमन गिल याच्याकडे आता उत्तर विभागीय संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. दुलीप करंडकासाठी उत्तर विभागीय संघाची घोषणा गुरुवारी (ता. ७) करण्यात आली.