
Shubman Gill Wants to put Special Performance in Final: भारत-न्यूझीलंड यांच्यामध्ये आज (ता. ९) होत असलेल्या चॅम्पियन्स क्रिकेट करंडकाच्या अंतिम फेरीच्या पूर्वसंध्येला शुभमन गिल याने पत्रकारांशी संवाद साधला. याप्रसंगी तो म्हणाला, भारतीय संघात अनुभवी खेळाडूंचा भरणा आहे. आयसीसीसारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये खेळण्याचा अनुभव त्यांच्याकडे आहे. त्यामुळे टीम इंडियाला याचा फायदा नक्कीच होईल.