

Shubman Gill Warn by Umpires: भारतीय संघासाठी डोखेदुखी ठरणारा ट्रॅव्हिस हेड यासामन्यातही चांगल्या लयमध्ये दिसत होता. पहिल्या षटकात जीवदान मिळाल्यानंतर त्याने पाचव्या षटकात फटकेबाजीला सुरूवात केली. आधी मोहम्मद शमीला ३ चौकार ठोकले, मग हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवरही हात खोलले. पण नवव्या षटकात रोहितने फिरकीपटू वरूण चक्रवर्थीच्या हाती चेंडू सोपवला. वरूणने आपल्या फिरकीच्या जादूवर हेडला फसवले अन् शुभमन गिलने सुंदर झेल करत हेडला माघारी पाठवले. पण झेल करणाऱ्या शुभमन गिलला अंपायर्सने सुचना केली.