
Steve Smith Catch Video Viral SL vs AUS: श्रीलंका विरूद्ध ऑस्ट्रेलिया पहिल्या वन-डे सामन्यात ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा डाव २१४ धावांवर गुंडाळला. ज्यामध्ये कर्णधार स्टीव्ह स्मिथने स्टंपच्या मागे एक अप्रतिम कॅच पकडला. विकेटकीपर अॅलेक्स कॅरीच्या हाताशेजारून निघालेला चेंडू स्मिथने तत्परता दाखवत टीपला. या डावात श्रीलंकेचा कर्णधार चरिथ असलंकाने शतक ठोकले. त्याच्या शतकी खेळीच्या मदतीने श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाला विजयसाठी २१५ धावांचे आव्हान दिले आहे.