Sri Lanka Women celebrate after stunning Bangladesh with a dramatic last-over victory in the ODI World Cup.
esakal
जयेंद्र लोंढे : सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २०: बांगलादेश महिला संघाने अखेरच्या षटकात चार फलंदाज गमावले आणि एकदिवसीय विश्वकरंडकातील श्रीलंकन संघाविरुद्धच्या लढतीत त्यांच्यावर सात धावांनी पराभवाची नामुष्की ओढवली. श्रीलंकन संघाने या स्पर्धेतील पहिल्या विजयासह एकूण चार गुणांची कमाई केली व आपले आव्हान कायम राखले. अखेरच्या क्षणी दोन धावांमध्ये पाच फलंदाज गमावणाऱ्या बांगलादेशचे आव्हान संपुष्टात आल्या जमा आहे. श्रीलंकन संघाकडून बांगलादेश संघासमोर २०३ धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते.