INDw vs AUSw: २८ चेंडूत फिफ्टी ते दमदार शतक! Smriti Mandhana ची तुफानी खेळी; बनली एका वर्षात ४ शतके झळकावणारी पहिली क्रिकेटपटू

INDw vs AUSw ODI Series : ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना उभारलेल्या २९८ धावांच्या प्रत्युत्तरात स्मृती मानधनाने जलद अर्धशतकासह शतकही पुर्ण केले आहे.
smriti mandhana
smriti mandhanaesakal
Updated on

INDw vs AUSw 3rd ODI : ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या तिसऱ्या वन-डे सामन्यात स्मृती माधनाने जलद अर्धशतक ठोकले. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत भारतासमोर २९८ धावांचा डोंगर उभा केला. ज्यामध्ये ॲनाबेल सदरलँडने शतक झळकावले. तर अॅशे गार्डनर व तहलिया मॅकग्रा यांनी अर्धशतकी खेळी केली. प्रत्युत्तरात भारतीय फलंदाजांनी आक्रमक पवित्रा घेतला आणि सलामीवीर स्मृती मानधनाने जलद अर्धशतक ठोकले व त्याचे शतकात रूपांतर केले.

२८ चेंडूत स्मृतीने अर्धशतक झळकावले आणि १३ चौकार व १ षटकारासह १०३ चेंडूत शतकी खेळी पुर्ण केली. स्मृतीचे हे ९ वे वन-्डे शतक आहे. ती एका वर्षात ४ शतके झळकावणारी पहिला महिला क्रिकेटपटू बनली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com