

Smriti Mandhana No. 2 ICC ODI Rankings : भारताची उपकर्णधार स्मृती मानधनाने ऑस्ट्रेलिया आणि वेस्टइंडिज विरुद्धच्या वन डे मालिकेत दमदार कामगिरी केली आहे. या चांगल्या कामगिरीमुळे तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मंगळवारी जाहीर केलेल्या महिलांच्या वन डे फलंदाजीच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. ट्वेंटी-२०तही स्मृती तिसऱ्या क्रमांकावर आहे.