India vs England : विजयी घोडदौड कायम ठेवण्याचा भारताचा प्रयत्न; इंग्लंडशी आज दुसरा सामना, हरमनप्रीत कौरचे पुनरागमन
India Women Cricket : स्मृती मानधनाच्या शानदार ११२ धावांमुळे भारताने पहिल्या टी-२० सामन्यात इंग्लंडवर ९७ धावांनी मोठा विजय मिळवला. हरमनप्रीत कौरच्या पुनरागमनाची शक्यता असल्याने दुसऱ्या लढतीत भारतीय संघ अधिक आत्मविश्वासात असेल.
ब्रिस्टॉल : सलामी फलंदाज स्मृती मानधना हिने पहिल्या लढतीत धडाकेबाज शतकी खेळी साकारली आणि भारतीय महिला क्रिकेट संघाने यजमान इंग्लंड संघावर ९७ धावांनी दणदणीत विजय संपादन केला.