
कोलकाता : विराट कोहली व रोहित शर्मा यांनी टी-२० व कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये मात्र हे दोनही खेळाडू खेळत राहणार आहेत. २०२७मधील एकदिवसीय विश्वकरंडक खेळण्याची इच्छा असली तरी दोन्ही अनुभवी क्रिकेटपटूंचा मार्ग खडतर असणार आहे, असे स्पष्ट मत व्यक्त केले आहे भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी.