Gautam Gambhir: तुमच्या फायद्यासाठी खेळाडूला लक्ष्य करू नका; गौतम गंभीर, हर्षित राणावरून माजी कर्णधार श्रीकांत यांना सुनावले
Social Media Criticism: गौतम गंभीर यांनी सोशल मीडियावर होणाऱ्या वैयक्तिक टीकेवर तीव्र शब्दांत प्रतिक्रिया देत भारतीय क्रिकेटसाठी सर्वांनी जबाबदारी घ्यावी, असे सांगितले. शुभमन गिलच्या नेतृत्वाचे कौतुक करताना त्यांनी तरुण खेळाडूंना समर्थन दिले.
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट हे आमच्यासारख्या प्रशिक्षक किंवा विविध संघात खेळणाऱ्या खेळाडूंचे नसून ते आपल्या सगळ्यांचे आहे. भारतीय क्रिकेट प्रगती करत राहावे ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे.