SL won against AUS by 1st ODIesakal
Cricket
SL vs AUS: ऑस्ट्रेलियाच्या चॅम्पियन्स ट्रॉफी संघाने श्रीलंकेसमोर गुडघे टेकले; नव्या सहकाऱ्यांना हाताळण्यात स्मिथ अपयशी
SL vs AUS 1st ODI : श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाविरूद्ध पहिल्या वन-डे सामन्यात ४९ धावांनी बाजी मारली. नव्या खेळाडूंसह उतरलेल्या स्टीव्ह स्मिथच्या संघाचा दणदणीत पराभव केला.
SL Won 1st ODI Against AUS : श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाविरूद्ध पहिल्या वन-डे सामन्यात एकहाती बाजी मारली. ऑस्ट्रेलियाचे ५ प्रमुख खेळाडू चॅम्पियन्स ट्रॉफी संघातून बाहेर झाल्यानंतर युवा खेळाडूंचा भरणा असलेला ऑस्ट्रेलिया संघ स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वात मैदानात उतरला. प्रथम गोलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा डाव २१४ धावांवर गुंडाळला व सोपे आव्हान स्वीकारले. पण गाठण्यात युवा ऑस्ट्रेलियन फलंदाज अपयशी ठरले व ऑस्ट्रेलियाने ४९ धावांनी सामना गमावला.

