
Sri Lanka Received Biggest Test Defeat By Australia: श्रीलंकेने आज त्यांच्या कसोटी इतिहासातील सर्वात मोठा पराभव स्वीकारला. गले मैदानावर झालेल्या या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने लंकेचा एकतर्फी पराभव केला, श्रीलंकेला एक डाव व २४२ धावांनी पराभूत केले. याआधी हा विक्रम भारताच्या नावावर होता. २०१७ मध्ये भारताने श्रीलंकेला १ डाव २३९ धावांनी पराभूत केले होते.