
Sunil Gavaskar advised to Rohit Sharma: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने चॅम्पियन्स करंडकातील यंदाच्या मोसमात अनुक्रमे ४१, २०, १५ व २८ धावा केल्या. प्रत्येक लढतीत त्याने आश्वासक सुरुवात केली; मात्र मोठी खेळी त्याला करता आली नाही. हाच धागा पकडून भारतीय संघाचे माजी कर्णधार व सध्याचे समालोचक सुनील गावसकर यांनी रोहित शर्माला सल्ला देताना म्हटले, की भारतीय कर्णधाराने २५ ते ३० धावांवर समाधानी राहू नये. त्याने मोठी खेळी करण्याला प्राधान्य द्यायला हवे. रोहित शर्मा खेळपट्टीवर जास्त काळ उभा राहिल्यास हा भारतीय संघासाठी सामन्याला कलाटणी देणारा क्षण असेल.