
Sunil Gavaskar Angry on England Former Cricketer: भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीतील सुरूवातीचे दोन्ही सामने जिंकून उपांत्यफेरी गाठली आहे. तर इंग्लंडने दोन्ही सामने गमावल्यामुळे स्पर्धेतील त्यांचे आव्हान संपुष्टात आले आहे. हायब्रीड मॉडेलमुळे स्पर्धेतील भारतीय संघाचे सर्व सामने दुबई आंतरराष्ट्रीय मैदानावर खेळवण्यात येत आहेत. तर इतर सर्व संघ पाकिस्तानमधील विविध मैदानांवर सामने खेळत आहेत. इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूंनी याच मुद्यावरून प्रश्न उपस्थित केला व भारताला दुबई आंतरराष्ट्रीय मैदानावर खेळण्याचा फायदा होत असल्याचा दावा केला.