
Sunil Gavaskar Raised Question on Coaching Staff Work : भारताने १० वर्षांनंतर बॉर्डर गावस्कर ट्रॉफीवरील वर्चस्व गमावले. भारताला ३-१ ने पराभूत करत ऑस्ट्रेलियाने बॉर्डर गावस्कर ट्रॉफीवर आपले नाव कोरले. भारतीय फलंदाजांच्या मालिकेतील खराब कामगिरीनंतर अनेकांनी भारतीय खेळाडूंचे कान टोचले. माजी कसोटीपटू सुनील गावस्कर व माजी खेळाडू इरफान पठाण यांनी 'देशांतर्गत क्रिकेट न खेळणे हे भारताच्या पराभवामागील मुख्य कारण असल्याचे सांगितले. त्याचबरोबर गावस्करांनी भारतीय कोचिंग स्टाफच्या कामावर देखील प्रश्न उपस्थित केला आहे.