Yashasvi Jaiswal: 'विशीत कोण ऐकतं...', गावसकरांनी ऐकवला इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेपूर्वी जैस्वालला रागावल्याचा किस्सा

Sunil Gavaskar: इंग्लंडविरुद्ध 700 हून अधिक धावा करण्यापूर्वी जैस्वालचे गावसकरांनी कान धरले होते.
Yashasvi Jaiswal | Sunil Gavaskar
Yashasvi Jaiswal | Sunil GavaskarSakal

Sunil Gavaskar reprimanded Yashasvi Jaiswal: भारताचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालने जानेवारी ते मार्च 2024 दरम्यान झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत शानदार कामगिरी केली. पाच सामन्यांच्या या कसोटी मालिकेत जैस्वालने 700 हून अधिक धावाही केल्या. त्यामुळे त्याने या मालिकेचा मालिकावीर पुरस्कार जिंकला.

तो एका कसोटी मालिकेत 700 हुन अधिक धावा करणारा सुनील गावसकर यांच्यानंतरचा दुसराच क्रिकेटपटू आहे. विशेष म्हणजे गावसकरांनी त्याला या मालिकेपूर्वी फटकारले आहे. याबद्दल त्यांनीच माहिती दिली.

भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर असताना जैस्वालने दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या डावामध्ये अर्धशतकी खेळी केल्यानंतर विकेट गमावली होती. त्यानंतर झालेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यादरम्यान जैस्वाल अचानक गावसकरांना जैस्वाल लिफ्टमध्ये भेटला. यावेळी त्यांनी त्याला वेस्ट इंडिजविरुद्ध अर्धशतकानंतर विकेट फेकल्याबद्दल फटकारले होते.

Yashasvi Jaiswal | Sunil Gavaskar
Mumbai Cricket: 'तुमच्यासारखा कुलकर्णी येणार नाही...', श्रेयस, शार्दुलसह मुंबईच्या खेळाडूंकडून धवलला मराठीतून शुभेच्छा

कदाचित गावसकरांची ती फटकार जैस्वालच्या कामी आली असावी. कारण त्याने इंग्लंड विरुद्ध 2 द्विशतकांसह 700 हून अधिक धावा केल्या.

याबद्दल गावसकरांनी हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना सांगितले आहे. ते म्हणाल, 'इंग्लंडविरुद्ध यशस्वीने केलेल्या सर्व धावा पाहून छान वाटले. महत्त्वाचे म्हणजे त्याने गोलंदाजी आक्रमणावर वर्चस्व गाजवले.'

'मी त्याला जरा सौम्य शब्दात त्याला हॉटेलच्या लिफ्टमध्ये असताना दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी फटकारले होते. कारण त्याने त्रिनिदाद कसोटीत त्याची विकेट एक चांगले अर्धशतक केल्यानंतर फेकली होती.'

'मी त्याला सांगितले होते की गोलंदाजांला मदत होईल असे काहीही करायचे नाही. सुदैवाने त्याने माझे ऐकले आणि इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत दोन मोठे द्विशतके केली. '

Yashasvi Jaiswal | Sunil Gavaskar
Shreyas Iyer: पाठदुखी विसरत श्रेयस अय्यरने धरला ढोलच्या तालावर ठेका, मुंबईच्या रणजी जेतेपदानंतरचा Video चर्चेत

गावसकर पुढे काहीसे गमतीने म्हणाले, 'त्याने आणखी तीन अर्धशतकेही केली आणि मी त्याला काय सांगितले होते, ते तो विसरला. पण तसंही विशीत असताना कोण कोणाचं ऐकतं तेव्हा. मीही नव्हतं ऐकलं. आशा आहे, तो आणखी मोठे यश मिळवले आणि ही गोष्ट कधीही विसरू नये की तो जो काही आहे, तो भारतीय क्रिकेटमुळे आहे.'

दरम्यान, जैस्वालने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत 5 सामन्यांत 89 च्या सरासरीने 712 धावा केल्या होत्या. यात त्याच्या दोन द्विशतकांचा आणि तीन अर्धशतकांचा समावेश होता.

तसेच त्याने या मालिकेदरम्यान कसोटी कारकिर्दीत 1000 धावाही पूर्ण केल्या. तो सर्वात कमी सामन्यात 1000 कसोटी धावा करणारा भारतीय खेळाडूही ठरला होता. त्याने 9 सामन्यातच 1000 धावा पूर्ण केल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com