
Vinod Kambli : भारतीय माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीच्या उपचारासाठी १९८३ वर्ल्ड कप विजेता संघ आर्थिक मदत करणार असल्याचे माजी क्रिकेटपटू सुनिल गावस्कर यांनी निश्चित केले आहे. रमाकांत आचरेकर सरांच्या स्मारक अनावरण सोहळ्यातील विनोद कांबळीचा व्हिडीओ पाहून अनेक क्रिकेटपटू आणि चाहते भावूक झाले. या सोहळ्याला १९८३ वर्ल्ड कप संघातील खेळाडू आणि आचरेकर सरांचे शिष्य बलविंदर सिंग संधू देखील उपस्थित होते. बलविंदर सिंग यांनी मीडियासोबतच्या संवादात १९८३ वर्ल्ड कप संघ विनोद कांबळींना उरपचारासाठी आर्थिक मदत करणार असल्याचे सांगितले होते.