Sunny Trophy: सुयोग भोसलेचा धडाका! ए. के. ग्रुपची कोथरूड अकादमीवर २९ धावांनी दणदणीत मात
AK Group Posts Competitive Total of 150 Runs: सनी करंडक टी-२० स्पर्धेत ए. के. ग्रुपने कोथरूड क्रिकेट अकादमीवर २९ धावांनी विजय मिळवला. सुयोग भोसलेच्या ४४ धावांच्या खेळीने संघाला विजय मिळवून दिला.
पुणे : सनी इलेव्हन क्रीडा प्रतिष्ठान आयोजित खुल्या गटाच्या सनी करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेत ए. के. ग्रुपने कोथरूड क्रिकेट अकादमीचा २९ धावांनी पराभव केला.