Suresh Raina
Suresh Raina Vs Shahid Afridiesakal

Suresh Raina : मोहालीतला सामना आठवतोय का... रैनाने आफ्रिदीवरून ट्रोल करणाऱ्या पाकिस्तानी पत्रकाराला दाखवून दिली लायकी

Published on

Suresh Raina Vs Shahid Afridi : युएसएमध्ये होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपमधील भारत - पाकिस्तान सामन्यापूर्वीच वातावरण तापू लागलं आहे. सुरेश रैनाने आयपीएलच्या एका सामन्यावेळी शाहिद आफ्रिदीला निवृत्तीमधून सारखं सारखं बाहेर येण्यावरून टोला हाणला होता. त्यानंतर आयसीसीने शाहिद आफ्रिदीची आयसीसी टी 20 वर्ल्डकप 2024 च्या अम्बॅसिडोरपदी निवड केल्यानंतर पाकिस्तानी पत्रकाराने सुरेश रैनाला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला.

सुरेश रैनाने आपला हजरजबाबीपणा दाखवत त्याला त्वरित रिप्लाय देत पाकिस्तानला अन् ट्रोल करणाऱ्या पत्रकाराला त्याची जागा दाखवून दिली. सोशल मीडियावरील या तापलेल्या वातावरणामुळे 9 जून रोजी होणाऱ्या भारत - पाकिस्तान सामन्याचा माहोल सेट होण्यास मदतच झाली.

Suresh Raina
SRH vs RR Qualifier 2 : ध्रुव जुरेलची झुंज अपयशी; हैदराबादनं तिसऱ्यांदा गाठली आयपीएलची फायनल

आयपीएल सामन्यावेळी सुरेश रैनाने आपल्याला नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळण्याची संधी मिळाली नसल्याची खंत व्यक्त केली होती. त्यावेळी दुसऱ्या समालोचकाने त्याला तू निवृत्तीतून बाहेर येत पुन्हा खेळण्याचा विचार करणार का असा प्रश्न विचारला. त्यावर सुरेश रैनाने शाहिद आफ्रिदीला टोला हाणला अन् म्हणाला की, मी सुरेश रैना आहे शाहिद आफ्रिदी आहे. मी निवृत्तीतून बाहेर येण्याचा कोणताही विचार करत नाहीये.

क्रिकेटच्या इतिहासात शाहिद आफ्रिदी हा निवृत्ती घोषित करणारा अन् नंतर त्यातून बाहेर येत पुन्हा खेळणारा खेळाडू म्हणून प्रसिद्ध आहे. दरम्यान आयसीसीने युवराज सिंग, ख्रिस गेल, उसेन बोल्टनंतर आता शाहिद आफ्रिदीला टी 20 वर्ल्डकप 2024 च्या ब्रँड अम्बॅसिडोर घोषित केलं. त्यानंतर पाकिस्तानी पत्रकाराने सुरेश रैनाला यावरून ट्रोल करण्याचा प्रयत्न केला.

Suresh Raina
IND vs PAK T20 WC 2024 Ticket : ललित मोदीलाही महागाईची झळ? भारत - पाकिस्तान सामन्याच्या तिकीटाचा दर पाहून संतापला

यावर सुरेश रैनाने त्वरित उत्तर देत पाकिस्तानी पत्रकाराला गप्प केलं. एक्सवरील पोस्टवर तो म्हणाला की, 'मी आयसीसीचा अम्बॅसिडोर नाही मात्र माझ्या घरी 2011 चा वनडे वर्ल्डकप नेला आहे. मोहालीतील सामना आठवतोय का? आशा आहे की आता तुमच्या काही जुन्या न विसरता येणाऱ्या आठवणी ताज्या झाल्या असतील.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com