Suryakumar Yadav: यंदा मुंबई इंडियन्स कात टाकणार! सहावं IPL विजेतेपद का जिंकू शकतात, सूर्यानं कारणही केलं स्पष्ट

Suryakumar Yadav on Mumbai Indians: मुंबई इंडियन्स आयपीएल २०२५ स्पर्धा का जिंकू शकतात, याचं मजेशीर कारण सूर्यकुमार यादवने सांगितले आहे.
Suryakumar Yadav  Mumbai Indians
Suryakumar Yadav Mumbai IndiansSakal
Updated on

येत्या २२ मार्चपासून आयपीएलची रंगत अनुभवायला मिळणार आहे. या स्पर्धेसाठी मुंबई इंडियन्सचा संघ सज्ज झाला आहे. याच पार्श्वभूमीवर या संघातील प्रमुख खेळाडू सूर्यकुमार यादव याने आपले मत व्यक्त करताना म्हटले की, हे वर्ष विषम संख्येचे (२०२५) असणार आहे.

मुंबई इंडियन्सने पाच पैकी चार विजेतेपद विषम संख्या असलेल्या वर्षी जिंकली आहेत. त्यामुळे यंदाही मुंबई इंडियन्सकडून अपेक्षा असणार आहे. मुंबई इंडियन्सचा संघ कात टाकेल.

मुंबई इंडियन्सच्या संघाने २०१३, २०१५, २०१७ व २०१९ या विषम संख्या असलेल्या वर्षी आयपीएल विजेतेपदाला गवसणी घातली आहे. मुंबई इंडियन्स संघाने सम संख्या असलेल्या वर्षी एक वेळा चॅम्पियन होण्याचा मान संपादन केला आहे. हे वर्ष २०२० होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com