
Suryakumar Yadav Visited Sai Baba Temple Shirdi : इंग्लंड संघ २२ जानेवारीपासून भारत दौऱ्यावर येत आहे. या दौऱ्यामध्ये इंग्लंड भारताविरूद्ध ५ ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. २०२५ मधील भारतीय संघाची ही पहिलीच ट्वेंटी-२० मालिका असणार आहे. या मालिकेपूर्वी भारतीय कर्णधाराने शिर्डीत जाऊन साईबाबांचे दर्शन घेतले. यावेळी त्याची पत्नीही उपस्थित होती.