T20 World Cup: सूमार खेळपट्टीवर धावा करणे आव्हानात्मक; दक्षिण आफ्रिकन संघाचा कर्णधार मार्करमचे मत

न्यूयॉर्कमधील नसाऊ क्रिकेटमध्ये ड्रॉप इन खेळपट्टीचा वापर करण्यात येत आहे, मात्र या खेळपट्टीवर धावा करताना फलंदाजांची दमछाक उडताना दिसत आहे.
T20 World Cup
T20 World Cupsakal

न्यूयॉर्क : न्यूयॉर्कमधील नसाऊ क्रिकेटमध्ये ड्रॉप इन खेळपट्टीचा वापर करण्यात येत आहे, मात्र या खेळपट्टीवर धावा करताना फलंदाजांची दमछाक उडताना दिसत आहे. श्रीलंका-दक्षिण आफ्रिका यांच्यामधील लढतीदरम्यान याचा प्रत्यय आला. याच पार्श्वभूमीवर दक्षिण आफ्रिकन संघाचा कर्णधार एडन मार्करम याने या खेळपट्टीवर धावा करणे आव्हानात्मक असल्याचे स्पष्ट मत याप्रसंगी व्यक्त केले.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीत श्रीलंकेचा डाव ७७ धावांवरच आटोपला, तसेच ७८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकन संघाला १६.२ षटकांपर्यंतची वाट बघावी लागली. यादरम्यान त्यांनी चार विकेट्‌सही गमावल्या. या लढतीत विजय मिळवल्यानंतरही मार्करम एडन याने खेळपट्टीवर नाराजी व्यक्त केली. तो म्हणाला, या खेळपट्टीवर चेंडू खालीवर राहात होते. चेंडूला उसळीही मिळत नव्हती. धावा करण्यासाठी मार्ग शोधावा लागत होता, पण येथील खेळपट्टीच्या रागरंगामुळे आम्हाला खूप काही शिकायला मिळाले आहे.

सलामी लढतीचा अनुभव मोलाचा

एडन मार्करम याने सलामीच्या लढतीत मिळवलेल्या विजयानंतर आपले मत व्यक्त करताना म्हटले की, न्यूयॉर्क स्टेडियममधील खेळपट्टीवर फलंदाजांना सहज धावा करता येणे अवघड आहे. अशा खेळपट्टीवर आम्ही विजय मिळवला. सलामीच्या लढतीतील अनुभव आमच्यासाठी मोलाचा आहे. कारण, यापुढील दोन लढती आम्हाला या मैदानातच खेळावयाच्या आहेत.

फलंदाजांकडून अपेक्षा

श्रीलंकन संघाचा कर्णधार वनिंदू हसरंगा याने याप्रसंगी मत व्यक्त करताना सांगितले की, आमची ताकद गोलंदाजी आहे. त्यामुळे नाणेफेक जिंकल्यानंतर आम्ही फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या लढतीत अपयश आले, पण ही स्पर्धेची सुरुवात आहे. आगामी लढतींमध्ये आम्हाला सुधारणा करावी लागणार आहे. मुख्यत: फलंदाजीत खेळ उंचवावा लागणार आहे. फलंदाजांनी चमकदार खेळ केल्यास गोलंदाज सामना जिंकून देऊ शकतील, असा विश्‍वास पुढे हसरंगाने व्यक्त केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com