
Team India Advantages in IND vs AUS Semifinal: भारतीय संघ आज ऑस्ट्रेलियाविरूद्ध चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील सेमीफायनलचा सामना खेळणार आहे. भारतीय संघ सध्याच्या घडीला मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये जगातील सर्वोत्तम संघ आहे. मागच्या ३ आयसीसी स्पर्धांमध्ये भारताने अवघा एक सामना गमावला आहे. ज्यामध्ये साखळी सामन्यांमध्ये एकही सामन्यात भारत पराभूत झालेला नाही. जो एक सामना गमावला, तो सामना होता २०२३ वन-डे वर्ल्ड कप फायनलचा. ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत करून या २०२३ वर्ल्ड कपवर आपले नाव कोरले होते. याच ऑस्ट्रेलिया संघाविरूद्ध आज सेमीफायनलध्ये भारतीय संघ भिडणार आहे. पण यावेळी भारताकडे काही बलस्थाने आहेत, ज्यामुळे भारत सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला दणका देऊ शकतो.