
Yashasvi Jaiswal Injury: भारतीय संघाचा खेळाडू यशस्वी जैस्वालला आज सरावादरम्यान घोट्याची दुखापत उद्भवली. त्यामुळे जैस्वाल उद्या उपचारासाठी बंगळूरूमधील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलेंसमध्ये जाणार आहे. जैस्वाल भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफी संघात नॉन-ट्रॅव्हलिंग राखीव खेळाडू होता. पण दुखापतीमुळे निवडकर्त्यांना आता त्याच्या जागी नव्या खेळाडूची निवड करावी लागणार आहे. त्यामुळे निवडकर्ते जैस्वालच्या जागी कोणाला संधी देणार हे पाहाणे महत्त्वाचे ठरले आहे.