
Top Rising stars of Indian Cricket in 2024 : भारतीय राष्ट्रीय संघात २०२४ मध्ये एकूण १२ खेळाडूंनी पदार्पण केले. ज्यामध्ये अभिषेक शर्मा, सर्फराज खान, ध्रुव जुरेल, रजत पाटीदार, आकाश दीप, साई सुदर्शन, रियान पराग, देवदत्त पडिक्कल, तुषार देशपांडे, रमणदीप सिंग, हर्षित राणा या खेळाडूंचा समावेश आहे. यापैकी अनेक खेळाडूंनी पदार्पणाच्या सामन्यात उल्लेखनीय कामगिरी केली. हे खेळाडू पुढे भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. भारतीय ट्वेंटी-२० संघात कर्णधार सूर्यकुमार यादव व हार्दिक पांड्या वगळता सर्व उदोन्मुख खेळाडूंचा भरणा आहे. यापैकी २०२४ वर्षात प्रभावशाली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंबद्दल जाणून घेऊयात.