
INDU19 vs SLU19 Semi Final Asia cup: आयपीएल लिलावात राजस्थान रॉयल्सने करारबद्ध केलेला १३ वर्षिय वैभव सुर्यवंशी १९ वर्षांखालील आशिया कप स्पर्धेत चांगल्या फॉर्ममध्ये पाहायला मिळत आहे. स्पर्धेत त्याने २ अर्धशतके ठोकली आहेत. श्रीलंकाविरूद्धच्या उपांत्यफेरीच्या सामन्यात त्याने ६७ धावांची दमदार खेळी केली. ज्यामध्ये दुसऱ्या षटकात तब्बल ३१ धावा ठोकल्या. एक चेंडू त्याने थेट मैदानाबाहेर मारला. भारताने १७४ धावांचे लक्ष्य अवघ्या २२ षटकांत पुर्ण केले, ज्यामध्ये वैभव सुर्यवंशीने महत्त्वाची भुमिका बजावली.