सुनंदन लेले : सकाळ वृत्तसेवा
दुबई, ता. ६ : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचा भारतीय संघ जाहीर झाला, ज्यात वरुण चक्रवर्तीचा अगदी शेवटच्या क्षणाला समावेश केला गेला. साखळी स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यांत त्याला संधी मिळाली नाही. न्यूझीलंड समोरच्या शेवटच्या सामन्यात त्याला खेळवले गेले. या लढतीत त्याने चक्क पाच फलंदाजांना बाद केले.