Vidarbha Cricketers in IPL 2025 AuctionSakal
Cricket
IPL 2025 Auction: विदर्भाच्या पाच खेळाडूचं नशीब फळफळलं, मिळाली मोठी किंमत; पण उमेश यादव 'अनसोल्ड'
Vidarbha Cricketers in IPL 2025 Auction: आयपीएल २०२५ लिलावात विदर्भाच्या खेळाडूंचीही छाप दिसून आली. या लिलावात विदर्भातील ६ खेळाडूंवर बोली लागली. पहिल्याच दिवशी यष्टीरक्षक फलंदाज जितेश शर्मावर ११ कोटींची बोली लावण्यात आली.
IPL 2025 Auction Updates: जेद्दाह (सौदी अरेबिया) येथे पार पडलेल्या आयपीएल २०२५ लिलावात अनेक देशांतर्गत क्रिकेट गाजवणाऱ्या खेळाडूंवर बोली लागली आहे. यामध्ये विदर्भाच्या खेळाडूंचीही छाप दिसून आली. पहिल्याच दिवशी यष्टीरक्षक फलंदाज जितेश शर्मावर ११ कोटींची बोली लावण्यात आली.
यश ठाकूर, अथर्व तायडे, शुभम दुबे व दर्शन नळकांडे या विदर्भाच्या अन्य क्रिकेटपटूंनाही संधी मिळाली आहे. हे पाचही खेळाडू आता पुढील वर्षी मार्च-एप्रिल महिन्यात होणाऱ्या आयपीएलमध्ये विविध संघांचे प्रतिनिधित्व करताना दिसणार आहेत.

