
Vidarbha vs Kerala Ranji Trophy 2025: नागपूर येथे केरळ व विदर्भ संघांदरम्यान रणजी ट्रॉफी स्पर्धेतील अंतिम सामना रंगला आहे. विदर्भाने पहिल्या डावात ३७९ धावा उभारल्या आहेत. ३ बाद २४ अशी विदर्भाची अवस्था असताना दानिश मेलवार व करूण नायरने २१५ धावांची भागीदारी केली अन् संघाचा डाव सावरला. ज्यामध्ये दानिश मेलवार दीडशतक ठोकले, तक करूण नायरने अर्धशतकी खेळी केली.