
नरेंद्र चोरेः सकाळ वृत्तसेवा
नागपूर : यजमान व दोनवेळच्या विजेत्या विदर्भ संघाने अपेक्षेप्रमाणे अंतिम सामन्यात केरळचा पहिल्या डावातील ३७ धावांच्या आघाडीच्या बळावर पराभव करून रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत तिसऱ्यांदा विजेतेपद पटकाविले. पहिल्या डावात शतक व दुसऱ्या डावात अर्धशतक झळकाविणारा विदर्भाचा दानिश मालेवार सामनावीर, तर यंदाच्या मोसमात सर्वाधिक ६९ बळी टिपणारा विदर्भाचाच फिरकीपटू हर्ष दुबे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला. उल्लेखनीय म्हणजे, गेल्यावर्षी उपविजेतेपद मिळविणारा विदर्भ संघ सहा वर्षांनंतर पुन्हा चॅम्पियन बनला आहे.