
MS Dhoni Dance at Rishabh Pant sisters Wedding : रविवारी भारतीय संघाने दुबईमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपले नाव कोरले. यावेळी विकेटकीपर फलंदाज रिषभ पंत देखील भारतीय संघाचा भाग होता. पण त्याला स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली नाही. दुबईमधून भारतात परतल्यानंतर रिषभ पंत बहिणीच्या लग्नाच्या तयारीला लागला. बुधवारी, १२ मार्च रोजी साक्षी पंतचे लग्न होणार आहे. रिषभच्या बहिणीच्या लग्नासाठी माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीसह पृथ्वी श्वॉ, नितिश राणा, सुरेश रैना, राहुल तेवातिया यांसारख्या क्रिकेटपटूंनी उपस्थिती लावली आहे. लग्नासाठी आज भारताचा कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली देखील हजेरी लावणार असल्याचे वृत्त आहे.