
पाकिस्तानविरुद्धच्या लढती तसेच विश्वकरंडक स्पर्धेतील बाद फेरीचे सामने यामध्ये क्रिकेटपटूंवर जे दडपण येते, त्याच स्वरूपाचा मानसिक ताण आणि दबाव टेनिसपटूंनाही सातत्याने झेलावा लागतो, असे मत भारताचा माजी कर्णधार आणि महान क्रिकेटपटू विराट कोहलीने व्यक्त केले आहे.
टी-२० नंतर कसोटी क्रिकेटमधूनही निवृत्ती स्वीकारणारा विराट कोहली सोमवारी (ता. ७) आपली पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मासह विम्बल्डनच्या सेंटर कोर्टवर उपस्थित होता. त्याने नोव्हाक जोकोविचचा सामना पाहिला आणि त्यानंतर भारताचे दिग्गज टेनिसपटू विजय अमृतराज यांच्याशी संवाद साधला.