
विराट कोहलीमध्ये आता मोठे फटके मारण्याचा खेळ शिल्लक राहिलेला नाही. एक काळ असा होता, की अशा प्रकारचा खेळ आपण विराटकडून पाहिला होता. आता तो शुभमन गिल त्याच्या इच्छेप्रमाणे जसे आक्रमक फटके मारतो तसे फटके विराट मारू शकत नाही, अशा स्पष्ट शब्दात माजी खेळाडू संजय मांजरेकर यांनी विराटच्या खेळाचे विश्लेषण केले आहे.
ऑस्ट्रेलियात दौऱ्यात धावा न झाल्यामुळे विराट कोहली अडचणीत आला आहे आणि त्याचा परिणाम आत्मविश्वासावर झाला आहे, असेही मांजरेकर यांनी म्हटले आहे.