
Virat Kohli Rohit Sharma Will Make Comeback : बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील खराब कामगिरीनंतर संघातील वरिष्ठ खेळाडू विराट कोहली रोहित शर्मा यांना अनेक टीकांचा सामना करायला लागला. अनेकांनी त्यांना विविध सल्लेही दिले. माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर व इरफान पठाण यांनी देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा सल्ला दिला. ही मालिका वरिष्ठ खेळाडूंसाठी शेवटची मालिका असेल असेही सांगितले जात होते. पण रोहितने तो पुढे खेळणार असल्याचे स्पष्ट केले आणि चर्चांना ब्रेक लागला. अनुभवी खेळाडूंवर मालिका गमावल्यानंतर टीका होत असताना, माजी क्रिकेटपटू नवजोत सिंग सिद्धू यांनी दोघांवरही पुनरागमन करतील असा विश्वास दाखवला आहे.