

VIRAT KOHLI TEST RETIREMENT
esakal
VIRAT KOHLI TEST RETIREMENT: भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली याने १२ मे २०२५ रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. विराटने २०११ मध्ये कसोटी पदार्पण केलं होतं. जवळपास १४ वर्षांच्या कारकिर्दीत त्याने अनेक विक्रम केले आहेत आणि भारतीय संघाला महत्त्वाचे विजय मिळवून दिले.
मात्र, विराटने कसोटी क्रिकेटमधून अचानक निवृत्ती का घेतली, याची चर्चा अजूनही सुरू आहे. आणि आता अशातच माजी भारतीय क्रिकेटपटू वसीम जाफर यांनी याबाबत मोठं विधान केलं आहे. विराटला ज्या पद्धतीने हाताळण्यात आलं, त्यामुळे तो काहीसा नाराज होता, असं जाफर यांनी म्हटलं आहे.