
Washington Sundar and Nitish Kumar Reddy partnership: जैस्वाल व विराटच्या भागीदारीनंतर भारताची आघाडी फलंदाजी ढासळली. तिसऱ्या दिवसाच्या सुरूवातीला ऋषभ पंत व रविंद्र जडेजाही स्वस्तात परतले. त्यानंतर दोन उदयोन्मुख फलंदाजांनी भारताचा मोर्चा सांभाळला व मोठी भागीदारी उभारत भारताचा डाव सावरला. संघ बिकट परिस्थितीत असताना नितिश कुमार रेड्डी व वॉशिंग्टन सुंदरने १२७ धावांची विक्रमी भागीदारी केली. सामन्यात सुंदरने अर्धशतकी कामगिरी केली. तर नितीशने शतक झळकावले.