
Washington Sundar Wicket Controversy : बॉर्डर गावस्कर मालिकेदरम्यान आपल्याला तिसऱ्या अंपायरने दिलेले अनेक वादग्रस्त निर्णय पाहायला मिळाले. स्निको मिटरवर किती विश्वास ठेवावा असा आता प्रश्न पडला आहे. मालिकेमध्ये आधी केएल राहुल, यशस्वी जैस्वाल आणि आता वॉशिंग्टन सुंदर स्निको मिटरच्या चुकीच्या निर्णयाचा शिकार बनला आहे. वॉशिंग्टनविरूद्ध दिलेल्या या तिसऱ्या पंचाच्या निर्णयामुळे स्निको पुन्हा चर्चेचा विषय ठरला आहे.