
कराची, ता. २४ : भारतीय क्रिकेट संघाकडून पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानच्या चॅम्पियन्स करंडकातील आव्हानाला हादरा बसला. न्यूझीलंडनंतर पारंपरिक प्रतिस्पर्धी भारतीय संघाकडून हार पत्करावी लागल्यानंतर पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंनी त्यांच्या खेळाडूंवर कडाडून टीका केली. पाकिस्तानच्या खेळाडूंमध्ये क्रिकेट या खेळावरील प्रेम, आवड, ऊर्जा, आग, आक्रमकता दिसूनच आली नाही, अशा शब्दांत कानउघाडणी करण्यात आली. प्रमुख फलंदाज बाबर आझम याचे अपयश टीकेच्या केंद्रस्थानी होते.