RCB च्या विजयानंतर व्हिडिओ कॉलवर विराट कोहली काय बोला? स्मृती मानधनाने केला खुलासा

Virat Kohli on Video Call Smriti Mandhana : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) संघाने स्मृती मानधना यांच्या नेतृत्वाखाली महिला प्रीमियर लीग 2024 चे विजेतेपद पटकावले. बंगळुरूने विजेतेपदाच्या सामन्यात मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला.
Virat Kohli on Video Call Smriti Mandhana Marathi News
Virat Kohli on Video Call Smriti Mandhana Marathi Newssakal

Virat Kohli on Video Call Smriti Mandhana : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) संघाने स्मृती मानधना यांच्या नेतृत्वाखाली महिला प्रीमियर लीग 2024 चे विजेतेपद पटकावले. बंगळुरूने विजेतेपदाच्या सामन्यात मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला.

आरसीबी चॅम्पियन झाल्यानंतर विराट कोहलीने व्हिडिओ कॉल करून महिला संघाचे अभिनंदन केले. आरसीबी महिला संघाच्या विजयाने विराट कोहली खूपच खूश दिसत होता.

Virat Kohli on Video Call Smriti Mandhana Marathi News
Ravindra Jadeja: 'नल्ला इरुक्कू, ऍश...' जड्डूच्या तमिळमधील शुभेच्छा ऐकून अश्विनलाही आवरेना हसू

आता स्मृती मंधानाने विजयानंतर विराट कोहलीसोबत व्हिडिओ कॉलवर काय चर्चा झाली याचा खुलासा केला आहे. विराट कोहली गेल्या 16 वर्षांपासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा भाग आहे. त्याने आयपीएलमध्ये आरसीबी पुरुष संघासाठी 16 हंगाम खेळले आहेत आणि यावेळी तो 17 व्या हंगामासाठी मैदानात उतरणार आहे.

मात्र, आरसीबीच्या पुरुष संघाने आतापर्यंत एकही विजेतेपद जिंकलेले नाही. अशा परिस्थितीत पहिले जेतेपद जिंकल्यानंतर कोहलीला नक्कीच आनंद झाला असेल.

Virat Kohli on Video Call Smriti Mandhana Marathi News
IPL 2024 : जोफ्रा आर्चर RCB कडून IPL खेळणार? 'या' पोस्टमुळे सोशल मीडियावर उडाली खळबळ

महिला संघाची कर्णधार स्मृती मानधना हिने व्हिडिओ कॉलवरील संभाषणाबद्दल सांगितले की, आवाजामुळे मला विराट भैया काय बोले हे मला नीट ऐकू आले नाही. गेल्या 16-17 वर्षांपासून विराट कोहली फ्रँचायझीसोबत काम करत आहे. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मला पाहायला मिळाला." विराट कोहलीच्या व्हिडिओ कॉलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Virat Kohli on Video Call Smriti Mandhana Marathi News
IPL 2024 : जोफ्रा आर्चर RCB कडून IPL खेळणार? 'या' पोस्टमुळे सोशल मीडियावर उडाली खळबळ

महिला प्रीमियर लीगच्या दुसऱ्या सत्रात (2024) दिल्ली कॅपिटल्सचा सलग दुसऱ्यादा अंतिम फेरीत पराभव झाला आहे. या स्पर्धेच्या पहिल्या सत्रात दिल्लीनेही अंतिम फेरी गाठली होती, मात्र त्यांना मुंबई इंडियन्सकडून पराभव स्वीकारावा लागला होता. यावेळी आता अंतिम फेरीत आरसीबीकडून पराभव झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com