मुंबई, ता. १० ः न्यूझीलंडचा पराभव केल्यानंतर रोहित शर्माच्या संघाने चॅम्पियन्स करंडक काल रविवारी उंचावला आणि पुन्हा एकदा मुंबईत तशीच विजयी मिरवणूक निघणार का, याची चर्चा सुरू झाली, परंतु या वेळी चॅम्पियन्स विजेत्या या संघाची विजयी मिरवणूक नसणार असल्याचे समजते.