

Bangladesh Defeate West Indies After 15 Years: बांगलादेशने कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजला घरच्या मैदानात पराभवाची धूळ चारली आहे. २००९ नंतर बांगलादेशने पहिल्यांदा वेस्ट इंडिजला पराभूत केले. मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यात बांगलादेशने १०१ धावांनी विजय मिळवला आणि मालिकेत १-१ ने बरोबरी केली.