
मँचेस्टर : बुधवारपासून सुरू होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताने चायनामन फिरकीपटू कुलदीप यादव याला खेळवण्याबाबत गांभीर्याने विचार केला पाहिजे, मात्र सध्याची संघरचना पाहता, कुलदीपची निवड भारतासाठी गुंतागुंतीची स्थिती निर्माण करू शकते, असे मत इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज स्टीव हार्मिसन याने व्यक्त केले आहे.