
नवी दिल्ली : तब्बल १२८ वर्षांनंतर क्रिकेट या खेळाचा ऑलिंपिकमध्ये समावेश करण्यात येणार आहे. लॉस एंजेलिस येथे २०२८ मध्ये होत असलेल्या ऑलिंपिकमध्ये क्रिकेट या खेळाला स्थान देण्यात आले आहे. पाकिस्तान व न्यूझीलंड या देशांच्या ऑलिंपिकमध्ये पदक पटकावण्याच्या आशांवर मात्र पाणी फेरले जाण्याची दाट शक्यता आहे. विभागीय पात्रता व क्रमवारी याचा फटका दोन्ही संघांना बसण्याची शक्यता आहे. याबाबतचे वृत्त प्रसारमाध्यमांमधून समोर आले आहे.