WPL 2024: RCB ने फक्त विजेतेपद जिंकलं नाही, तर 'या' पुरस्कारांवरही गाजवलं वर्चस्व, पाहा विजेत्यांची संपूर्ण लिस्ट

WPL 2024 Awards Winners: वूमन्स प्रीमियर लीग 2024 स्पर्धेतील अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांवरही रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचे वर्चस्व राहिले. पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी पाहा.
Shreyanka Patil | RCB | WPL 2024
Shreyanka Patil | RCB | WPL 2024Sakal

WPL 2024 Awards Winners: वूमन्स प्रीमियर लीग २०२४ स्पर्धेचा अंतिम सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात पार पडला. या अंतिम सामन्यात बंगळुरूने ८ विकेट्सने विजय मिळवत विजेतेपदाला गवसणी घातली.

दरम्यान, दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर पार पडलेल्या अंतिम सामन्यानंतर या डब्ल्युपीएल हंगामाचा पुरस्कार सोहळाही पार पडला. या पुरस्कार सोहळ्यातही बेंगलोरच्या खेळाडूंचे वर्चस्व दिसून आले.

Shreyanka Patil | RCB | WPL 2024
WPL Prize Money : विजेतेपद जिंकल्यानंतर RCB झाली मालामाल! पाकिस्तान सुपर लीगपेक्षाही मिळाले दुप्पट पैसे

अनेक महत्त्वाचे पुरस्कार बेंगळुरूच्या खेळाडूंनी आपल्या नावे केले. यात पर्पल कॅप आणि ऑरेंज कॅपचाही समावेश आहे. सर्वाधिक विकेट्ससाठी देण्यात येणारी पर्पल कॅप श्रेयंका पाटीलने जिंकली, तर सर्वाधिक धावांसाठी देण्यात येणारी ऑरेंज कॅप एलिस पेरीने जिंकली.

दरम्यान, विजेतेपद जिंकलेल्या बेंगळुरू संघाला 6 कोटी बक्षीस रक्कम देण्यात आली, तर उपविजेत्या दिल्ली कॅपिटल्स संघाला 3 कोटी रुपये देण्यात आले.

Shreyanka Patil | RCB | WPL 2024
Smriti Mandhana: 'आता ए साला कप नामदू म्हणायचं', RCB च्या विजयानंतर असं का म्हणाली मानधना?

डब्ल्युपीएल 2024 स्पर्धेतील पुरस्कार विजेते आणि बक्षीस रक्कम

  • विजेता संघ - रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (6 कोटी रुपये)

  • उपविजेता संघ - दिल्ली कॅपिटल्स (3 कोटी रुपये)

  • ऑरेंज कॅप - एलिस पेरी (आरसीबी) (5 लाख रुपये) (347 धावा)

  • पर्पल कॅप - श्रेयंका पाटील (आरसीबी) (5 लाख रुपये) (13 विकेट्स)

  • हंगामातील व्हॅल्युएबल खेळाडू - दिप्ती शर्मा (युपी वॉरियर्स) (5 लाख रुपये)

  • हंगामातील सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडू - श्रेयंका पाटील (आरसीबी) (5 लाख रुपये)

  • पॉवरफुल स्ट्रायकर - जॉर्जिया वेरहॅम (आरसीबी) (5 लाख रुपये)

  • हंगामात सर्वाधिक षटकात - शफाली वर्मा (दिल्ली कॅपिटल्स) (5 लाख रुपये) (20 षटकार)

  • हंगामातील सर्वोत्तम झेल - एस सजना (मुंबई इंडियन्स) (5 लाख रुपये)

  • अंतिम सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू - सोफी मोलिनेक्स (आरसीबी) (2.5 लाख रुपये)

  • अंतिम सामन्यातील पॉवरफुल स्ट्रायकर - शफाली वर्मा (दिल्ली कॅपिटल्स) (1 लाख रुपये)

  • फेअरप्ले पुरस्कार - रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com