
WPL Auction 2025: वूमेन्स प्रिमिअर लिगच्या लिलावाची पहिलीच बोली १.७ कोटींची लागली. सर्वाधिक बेस प्राईज असणाऱ्या खेळाडूवर ही बोली लावण्यात आली आहे. वेस्ट इंडिजची अष्टपैलू खेळाडू डिएंड्रा डॉटिनने डब्ल्यूपीएल या लिलावासाठी सर्वाधिक ५० लाखाची मूळ किंमत ठेवली होती. तिला १.७ कोटींमध्ये गुजरात जायंट्स संघाने करारबद्ध केले आहे. तर सर्वाधिक मूळ किंमत ठेवणारी इंग्लडची कर्णधार हेदर नाईट या लिलावात अनसोल्ड राहिली आहे.