Yashasvi Jaiswal :रडारवर गावसकरांचा 53 वर्षे जुना विक्रम; यशस्वी धरमशाला कसोटीत करणार का मोठा धमाका?

Yashasvi Jaiswal IND vs ENG : यशस्वी जैस्वाल पाचव्या कसोटीत शतकी खेळी करून विराटसह गावसकरांचा मोठा विक्रम मोडू शकतो.
Yashasvi Jaiswal
Yashasvi Jaiswalesakal

Yashasvi Jaiswal Sunil Gavaskar Test Cricket Record : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा आणि शेवटचा सामना धरमशाला येथे होत आहे. या सामन्यात भारताचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल कशी कामगिरी करतो यावर सर्वांचे लक्ष आहे. त्याने आतापर्यंत मालिकेतील प्रत्येक सामन्यात 50 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. याचबरोबर पाठोपाठ दोन द्विशतके ठोकण्याचा देखील पराक्रम केला आहे.

शेवटच्या धरमशाला कसोटीत यशस्वी जैस्वाल सुनिल गावसकरांचा एक मोठा विक्रम मोडण्याची शक्यता देखील आहे. यशस्वीने चार कसोटीत आतापर्यंत 655 धावा केल्या आहेत. इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय फलंदाजांकडून सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत तो विराट कोहलीसोबत अव्वल स्थानावर विजाजमान आहे. पाचव्या कसोटीत तो विराटला देखील मागे टाकू शकतो. (Cricket Marathi News)

Yashasvi Jaiswal
Kane Williamson Video : विलियमसनबाबत 12 वर्षानंतर असं घडलं; विल यंग धडकला नसता तर कदाचित...

याचबरोबर भारताकडून एका द्विपक्षीय कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा सुनिल गावसकरांचा 53 वर्षे जुना रेकॉर्ड देखील तो मोडू शकतो. सुनिल गावसकर यांनी 1971 च्या वेस्ट इंडीज दौऱ्यावर 774 धावा केल्या होत्या. तर 1978-79 मध्ये वेस्ट इंडीजविरूद्ध भारतात झालेल्या मालिकेत 732 धावा केल्या होत्या.

विराट कोहलीने देखील 2014-15 मध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध 692 धावा केल्या होत्या. यशस्वी जैस्वालला विराटचा विक्रम मागे टाकण्यासाठी यशस्वीला 37 धावा करणे गरजेचे आहे तर सुनिल गावसकरांचा 53 वर्षापूर्वीचा विक्रम मोडण्यासाठी 119 धावा करणे गरजेचे आहे.

Yashasvi Jaiswal
Match Fixing Video : आयपीएल प्लेअरने केले मॅच फिक्सिंगचे आरोप... बंगाल क्रिकेट बोर्डाच्या सचिवापर्यंत धागेदोरे?

भारताकडून द्विपक्षीय कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

  • सुनील गावसकर : 1971 मध्ये वेस्टइंडीज के विरुद्ध 774 धावा.

  • सुनील गावसकर : 1978/79 मध्ये वेस्टइंडीज विरूद्ध 732 धावा.

  • विराट कोहली : 2014/15 ऑस्ट्रेलिया विरूद्ध 692 धावा.

  • यशस्वी जैस्वाल : 2024 इंग्लंड विरूद्ध 655* धावा.

  • विराट कोहली : 2016 मध्ये इंग्लंडविरूद्ध 655 धावा.

  • दिलीप सरदेसाई : 1971 वेस्ट इंडीजविरूद्ध 642 धावा.

  • राहुल द्रविड : 2003-04 ऑस्ट्रेलियाविरूद्ध 619 धावा.

  • विराट कोहली : 2017 मध्ये श्रीलंकेविरूद्ध 610 धावा.

  • राहुल द्रविड : 2002 इंग्लंडविरूद्ध 602 धावा.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com