
Yashasvi Jaiswal and Sarfaraz Khan : भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेत एकतर्फी पराभव झाल्यानंतर आता भारतीय क्रिकेटपटू देशांतर्गत क्रिकेटकडे वळले आहेत. सकाळी रोहित शर्मा मुंबई संघासह वानखेडे मैदानावर सराव करताना पाहायला मिळाला. शुभमन गिलनेही पंजाब टीमकडून रणजी ट्रॉफी सामना खेळणार असल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर दिल्लीकडून विराट कोहली व ऋषभ पंत देखील देशांतर्ग क्रिकेट खेळणार असल्याचे समजले. त्यात आता मुंबईकर यशस्वी जैस्वालनेही देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे.