
Yuzvendra Chahal and Dhanashree Verma Divorce भारतीय क्रिकेटपटू युझवेंद्र चहल व धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाची अंतिम सुनावणी आज मुंबईतील कौटुंबिक न्यायालयात झाली. यावेळी फिरकीपटू युझवेंद्र चहल व कोरिओग्राफर धनश्री वर्मा दोघेही उपस्थित होते. चहलचे वकिल नितीन कुमार गुप्ता यांनी गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना कोर्टाने घटस्फोट मान्य केला असल्याचे सांगितले आहे.
"न्यायालयाने घटस्फोटाचा हुकूम मंजूर केला आहे व दोघांचीही संयुक्त याचिका स्वीकारली आहे. दोघेही आता पती-पत्नी राहिलेले नाहीत," गुप्ता म्हणाले.