
Yuzvendra Chahal Mystery Girl RJ Mahvash New Video Viral: फेब्रुवारीमध्ये क्रिकेटपटू युझवेंद्र चहलचा धनश्री वर्मासोबत घटस्फोट झाला. फिरकीपटू चहल आता आरजे माहवश सोबत अनेकदा दिसला आहे. त्यामुळे दोघे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली. चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलला दोघेही एकत्र दिसल्याने रिलेशनशीपच्या चर्चांनी वेग घेतला. चहलच्या या कथित गर्लफ्रेंडने सोशल मीडियावर पोस्ट करत चहलची आधीची पत्नी धनश्री वर्मामवर निशाणा साधला असल्याचे म्हटले जात आहे.