
ZIM vs PAK T20 Series : झिम्बाब्वे दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तान संघाने ट्वेंटी-२० मालिका ३-१ ने जिंकली. सुरुवातीच्या दोन सामन्यात एकतर्फी विजय मिळवला. पण अंतिम सामना अटीतटीचा झाला, ज्यात झिम्बाब्वेने २ विकेट्स राखून विजय मिळवत पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली. झिम्बाब्वेने सामन्यात ७ गोलंदाजांचा वापर करत पाकिस्तानचा डाव स्वस्तात गुंडाळला आणि विजय सोपा केला. सामना अंतिम षटकापर्यंत गेला पण पाचव्या चेंडूवर यजमानांनी विजय नोंदवला आणि मालिकेचा शेवट विजयी केला.